फ्रेंड्स स्कूल कोरेगाव भीमा विद्यालयात पालखी सोहळा साजरा,

Bharari News
0

सुनील भंडारे पाटील    

              विठ्ठल नामाची शाळा भरली.. ..या उक्ती प्रमाणे फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या फ्रेंड्स स्कूल कोरेगाव भिमा मध्ये अतिशय आनंदमय वातावरणात पालखी सोहळा साजरा करण्यात आला.               

संस्थेचे अध्यक्ष श्री राजाराम ढेरंगे विद्यार्थ्यांनी हरीनाम आपल्या जीवनात उतरावे आणि आयुष्याचे सोने करून घावे तर संस्थेचे संचालक श्री शंकर गव्हाणे यांनी वारी हि आषाढी एकादशी पुरती मर्यादित नसून ती दैनंदिन जीवनात रोजच घडावी असा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. मुख्याध्यापक श्री. एम. एन. हराळ पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्याना आषाढी एकादशीचे महत्व पटवून दिले.                
पालखीचे पूजन शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई ,  संत नामदेव,  संत एकनाथ अशा अनेक वेशभूषा केलेल्या होत्या. या सोहळ्यामध्ये  नर्सरी विभागापासून इयत्ता  दहावीच्या वर्गापर्यंतच्या सर्व मुलांनी आणि मुलींनी सहभाग  घेतला . विद्यार्थ्यांनी विविध अभंग, भजन यावर ताल धरत विठ्ठल नामाचा जयघोष केला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष  पालखी ढोल ,ताशा, लेझिम च्या गजरात  शाळेपासून कोरेगाव-भीमा ग्रामपंचायत  पटांगणात आणली.

त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी रिंगण करून विद्यार्थ्याच्या फुगडीचे विविध प्रकार सादर केले.टाळ, मृदंगाच्या तालावर भजन गायन केले. सदर पालखी सोहळ्याची सांगता पसायदानाने केली.पालखी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापक श्री मदन हराळ यांच्या  मार्गदर्शकनाखाली  नर्सरी विभागाच्या प्रमुख सौ निर्मला गव्हाणे , प्राथमिक विभागाच्या प्रमुख वाळुंज आणि वैशाली धर्माधिकारी तसेच माध्यमिक विभागाच्या प्रमुख अजिताकुमारी नायर , वरिष्ठ शिक्षक मारुती दरेकर,किरण दरवडे, शंकर बोरकर, भाविन सैंदाणे ,श्रीमंत प्रताळे इतर सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  माधुरी गुंडाळ,सविता शिंदे आणि आभार सत्यम हंबीर यांनी मानले.पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले ,उपाध्यक्ष प्रकाश खेरमोडे ,  संचालक शंकर गव्हाणे, संचालक रामदास सव्वाशे,  संचालक राजेंद्र गव्हाणे इतर सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!