मुखई आश्रमशाळेत रंगला दिंडी सोहळा

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
          आषाढी एकादशीचे औचित्य साधून मुखई येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये दिंडी सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.         
मुखई येथील पलांडे आश्रम शाळेत आयोजीत दिंडी सोहळा.(छाया : नमीरा डिजीटल)
मुखई (ता. शिरुर) येथील आश्रम शाळेत आयोजीत दिंडी सोहळ्यासाठी यथोचित अशी पालखी, पताका, झेंडे,विविध रंगी वारकरी पोशाख, तुळशी, टाळ,माळा अशी सर्व तयारी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती आणि दिंडी सोहळ्यामध्ये आकर्षण निर्माण करत होती. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी या आनंद सोहळ्यामध्ये अक्षरश न्हाऊन निघाले. प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी  आषाढी एकादशीचे महत्व, वारकरी संप्रदायातील या दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि सर्व उपस्थितांना सांगितले. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे, मूर्तीचे यथोचित असे पूजन करून आरती घेण्यात आली आणि त्यानंतर पालखी सोहळा हा मुखईगावात मार्गस्थ झाला. गावांमधील जागृत, प्रसिद्ध असे श्री काळभैरवनाथाचे मंदिराच्या चौकामध्ये गोलाकार रिंगणामध्ये विद्यार्थी-शिक्षक सर्वांनी अभंग, भजन, ओव्या यांचे सुस्वर असे वाद्यांवर गायन केले. तसेच रिंगणाच्या मध्यभागी स्त्री-पुरुष, सर्व शिक्षक-विद्यार्थी यांनी फुगडी खेळण्याचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करण्याचा आनंद व्यक्त केला. पालखी सोहळा मुखई गावातून शाळेमध्ये आल्यानंतर उपस्थित सर्व पालकांच्या समवेत विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे आणि प्रतिमेचे पूजन करून त्यांची आरती करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाची पूर्वतयारी व नियोजन सांस्कृतिक विभागाच्या लिमगुडे मॅडम, मल्लाव सर, पाटील मॅडम यांनी केले. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे तसेच कार्याध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे यांचेकडून मोलाचे सहकार्य लाभले. जयश्रीताई पलांडे व  अॅड. अशोकराव पलांडे यांची आषाढी वारीची परंपरा कायम करत त्यांच्याच संकल्पनेतून व त्यांच्या आदर्शातून या वर्षी शाळेत ह्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचेही याप्रसंगी बोलताना प्राचार्य शिरसाट यांनी सांगितले. दिंडी सोहळा हा अतिशय सुंदर पार पडला. संस्थेचे सचिव सुरेश पलांडे यांनी वारकरी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आनंद रूपी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!