आंबेगाव प्रमिला टेमगिरे
घोडेगाव ( लांडेवाडी ) आंबेगाव ता. आढळराव पाटील यांनी सोमवारी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
सविस्तर : आढळराव यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्यात आढळराव बोलत होते. ते म्हणाले की, खेड पंचायत समितीत शिवसेनेची एकहाती सत्ता होती. आपल्या लोकांवर दहशत बसवून आमिषं दाखवून आठपैकी सहा पंचायत समिती सदस्य फोडले आणि राष्ट्रवादी त्यांना घेऊन गेली.
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाच्या खडकवासलामधील हॉटेलवर त्यांना ठेवण्यात आले. त्यातील काही लोकांनी फोन केल्यानंतर सभापती व इतर लोक त्यांना सोडवायला गेले. त्या ठिकाणी झटापट झाली. मारहाण झाली पण दुसऱ्या दिवशी सकाळी ३०७ चा गुन्हा दाखल झाला. गेली सहा महिने आपला सभापती जेलमध्ये आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत सर्वांना भेटलो. पण, माझ्या सभापतीला न्याय मिळाला नाही. सभापती जेलमध्ये जातोय, खोटे गुन्हे असूनही त्याला जामीन मिळत नाही, त्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे, हे पाहून विषण्ण वाटायचं राष्ट्रवादीचा प्रचार करण्यास सांगितल्याचे न पटल्यानेच शिवसेना सोडली : आढळराव आपल्या तातडीने बोलविण्याचे कारण काल दुपारपासून सर्व माध्यमांमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात बातमी फिरत होती. बहुतांश लोकांनी अभिनंदन केले, अगोदर सांगितले असते तर आम्हीही आलो असतो, असे काहीजण म्हणाले. जवळजवळ १८ ते १९ वर्षे तुमच्यासोबत काम करत आहे. या वर्षात हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार कधी सोडला नाही. हिंदुत्वाच्या विचारापासून कधीही लांब गेलो नाही. अनेक संकटं आली. माझी अठरा वर्षांची कारकिर्द फक्त आणि फक्त संघर्ष करण्यातच गेली.
आढळरावांचा शिवसेनेला अखेर ‘जय महाराष्ट्र’; हकालपट्टीच्या अपमानाचे उट्टे काढले!
शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मलाच मैदानात उतरावे लागते. खासदार असताना आणि नसतानाही मी अजूनही ते काम करत आहे. मला आजही वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात १० फोन करावे लागतात. शिक्रापूर, रांजणगाव, मंचर, घोडेगाव, चाकण, आळेफाटा, ओतूर या पोलिस ठाण्यात फोन करून आमच्या शिवसैनिकांवर खोटी केस दाखल केली आहे, त्यांना त्रास होतो आहे, तडीपार केले आहे, असे सांगत असायचो. हे मी माझ्या शिवसैनिकांसाठी करत होतो, माझ्यासाठी काही नव्हतं, असेही माजी खासदार आढळराव यांनी स्पष्ट केले.........