रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
दर महिन्याला पंचवीस हजार रुपयांची खंडणी दे नाहीतर कंपनीतील काम बंद कर अशी धमकी दिली गेल्यामुळे चार जणांवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्ठेशनला खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत दिलीप कांतीलाल थेऊरकर वय ३३ वर्षे, ,सध्या रा. शिरुर, बाबुरावनगर ,कमलसंध्यासोसायटी,ता.शिरुर,जि.पुणे. मुळ रा.राजापुर दाणेवाडी,ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर. यांनी फिर्याद दिली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की , दिलीप थेऊरकर हे सोमवार दि. १८ रोजी सकाळी १०.३० ते ११.१५ वा.च्या दरम्यान रांजणगाव एमआयडीसी मधील “क्लासिक ट्युब” (अपोलो टायर्स) कंपनीच्या नवीन गेटजवळुन गाडी क्र. एम एच १२ एन.यु.८२८२ मधुन जात असतांना दत्तात्रय गायकवाड रा.मलठण ,ता.शिरुर,जि.पुणे व त्याचे सोबतचे इतर तीन अनोळखी इसम यांनी त्यांचेकडील एका पांढऱ्या रँगाच्या इनोव्हा गाडी क्र. एम.एच.१२ ६९७१ या वाहना मधुन येवुन थेऊरकर यांना गाडी आडवी मारुन थांबविण्यास भाग पाडले. व थेऊरकर यांना तुझे “कंपनीतील लेबर काँन्ट्रँक्ट बंद कर, नाहीतर आम्हाला दर महिन्याला २५,०००/-रु. खंडणी दे” असे म्हणुन गाडीची काच बुक्की मारुन तोडुन थेऊरकर यांना खाली ओढुन घेवुन हाताने-लाथाबुक्यांनी मारहाण करुन दगडाने व लोखंडी राँडने मारण्याची धमकी देवुन त्यांचेकडील इनोव्हा गाडीमध्ये जबरदस्तीने बसवुन नेले आहे. इनोव्हा मधुन जबरदस्तीने घेवुन जातांना त्यांनी मला गाडीमध्ये हाताने मारहाण करुन दत्ता गायकवाड याने मला “तु काँन्ट्रँक्ट बंद कर, नाहीतर दर महिन्याला 25,000/रु.दे,तु मला अजुन ओळखले नाही” असे म्हणुन शिवीगाळ,दमदाटी करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन थेऊरकरांकडुन ५०,०००/- रु. रोख खंडणी घेतली आहे. आरोपी दत्तात्रय गायकवाड रा. मलठण,ता.शिरुर,जि.पुणे व त्याचे सोबतचे इतर तिन अनोळखी साथीदार यांच्यावर खंडणी , अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक .बळवंत मांडगे हे करत आहेत.