सुनील भंडारे पाटील
तुळापूर तालुका हवेली, मरकळ तालुका खेड या दोन गावांच्या मध्ये असणाऱ्या इंद्रायणी नदीचे पाणी अतिशय प्रदूषित झाले असून, पाण्यावर जल वनस्पती (कांजवन) चा मोठा थर तयार झाला आहे,
आळंदी शहरापासून पुढे अनेक गावे नदीच्या किनाऱ्यावर बसलेली असून गावातील सांडपाणी प्रदूषित पाणी नदीत सोडल्याने नदीचे पाणी पूर्णपणे काळे व प्रदूषित झाले असून, या घाण पाण्यावर जलवनस्पती मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे, पाण्यावर कांज्वनाचा थर तयार होऊन नदीने हिरवी चादर ओढली की काय असे चित्र आहे,पाण्याचे पात्र देखील दिशेनासे झाले आहे, याचा परिणाम अवलंबून असणाऱ्या शेती क्षेत्रावर, जलचर प्राणी यांच्यावर होत असून, शेतकरी व मच्छीवार व्यवसायिकांचे खूप मोठे नुकसान होत आहे, नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी काठावरील गावांनी, ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज आहे, गावांमधील सांडपाणी नदीमध्ये न सोडता त्याचा निचरा गावातच केला पाहिजे, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, नदीमध्ये जलपर्णी (कांजवन) याचे प्रमाण खूपच वाढले आहे, याचा परिणाम गाव पाणीपुरवठा योजना, शेती, जलचर प्राणी याच्यावर होणार आहे,