शिक्रापूर येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान- शिरूर वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचा उपक्रम

Bharari News
0

 शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला

                  शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात शिरुर वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव शेरखान शेख, अध्यक्ष श्रीकांत भाडळे व सदस्यांच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.

 
शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शिरुर वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान करताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व उपस्थित मान्यवर 
      या कार्यक्रमास महावितरणचे अभियंता नितीन महाजन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर, शिक्रापूरचे उपसरपंच मयूर करंजे, धानोरेच्या ग्रामपंचायत सदस्या वैशालीताई येवले,  शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, सणसवाडीचे ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. अर्चना शेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ काशीद, आरोग्य अधिकारी डॉ. हेमा देठे, डॉ. पवन सोनवणे, डॉ. रविंद्र टेमगिरे, डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. नितीन सोनवणे, डॉ. शरद लांडगे, डॉ. राजीव कोपुळवार, डॉ. भाऊसाहेब पोळ, डॉ.किरण चपाई, डॉ. दिपक पाटील, डॉ. धनंजय खेडकर आदींचा सन्मान करण्यात आला.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या सर्पमित्र शेरखान शेख यांचा विशेष सन्मान करताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व उपस्थित मान्यवर,

         यावेळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या सर्पमित्र व शिरुर वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव शेरखान शेख तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भाडळे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे म्हणाले की कोरोना काळात डॉक्टरांनी केलेले काम अनमोल आहे. आजार नवीन होता, कोणालाच कांही माहीत नव्हते मात्र डॉक्टर देवदूतासारखे धावून आले त्यामुळे कोरोना साथ नियंत्रणात आली. शेरखान शेख या तरुणाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह आहे. सर्पमित्र म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव असल्याचेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ काशीद यांनी यावेळी बोलताना सांगितले की शेरखान शेख, श्रीकांत भाडळे व त्यांच्या संस्थेचे कार्य महान आहे. डॉक्टर अहोरात्र काम करून नागरिकांना सेवा पुरवितात तसेच कोरोना काळात सर्वच डॉक्टरांनी केलेल्या कामाची दखल घेऊन आम्हा सर्व डॉक्टरांचा वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मान केल्याने आम्हाला या पुरस्काराने प्रेरणा मिळाली आहे. शेरखान शेख यांनी कोरोना काळात घरोघरी जाऊन अन्न धान्याचे वाटप केले तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गोरगरिबांना व गरजूंना मदत, सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून दिवस-रात्र काम, सामाजीक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग अशा हरहुन्नरी शेरखान शेख यांचे कार्य अतुलनीय असल्याचेही याप्रसंगी बोलताना डॉ.काशीद यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिरुर वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सदस्य बाळासाहेब मोरे, नितीन वाळिंबे, अमोल कुसाळकर, अतुल थोरवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेरखान शेख यांनी केले. प्रा. एन.बी.मुल्ला यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रवीणकुमार जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीकांत भाडळे यांनी आभार मानले,


 

 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!