आंबेगाव प्रमिला टेमगिरे
घोडेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं 147/2021भा.द.वि.क. 420,507 मधील फिर्यादी महंत बेलनाथ महाराज गोरक्षनाथ आश्रम कमलजामाता मंदीर
राजेवाडी, वय 59वर्षे, धंदा- देवसाधना व किर्तन/ प्रवचन , रा राजेवाडी
ता.आंबेगाव जि. पुणे यांनी आरोपी प.पु महंत108श्री स्वामी रामानंदजी
महाराज, तथा श्री विनायक पांडुरंग उईके, रा श्री संत भाकरे महाराज सेवा
आश्रम, श्री क्षेत्र चांधणी बर्डी, पोस्ट खराडी ता नरखेडा जि नागपुर यांनी
फिर्यादी व साक्षीदार यांना नोकरीस लावतो असे आमिष दाखवून नोकरीस न लावता
त्यांचेकडून एकुण 2,51,000रू घेऊन त्यांना नोकरीस न लावता त्यांची फसवणुक
केलेबाबत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीस नागपूर येथे जाऊन अटक
करण्यात आली आहे. अशा अनेक तरुणांकडून या भामट्याने पैसे घेऊन फसवणुका केले असल्याचे चर्चा
सध्या जोर धरू लागली आहे, गुन्हा उघड झाल्यामुळे रीतसर कारवाई झाल्यामुळे
आता ह्या फसवणूक करणाऱ्या भामट्याची अनेक प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता
बोलून दाखवली जात आहे,
सदर गुन्ह्याची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री अभिनव देशमुख सो.मा.अपर पोलीस अधीक्षक
श्री.मितेश घट्टे सो.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुदर्शन पाटील सो.
यांचे मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिस स्टेशनचे स.पो.नि.श्री.जीवन
माने,पो.उप निरीक्षक श्री.अनिल चव्हाण पो.कॉ.निलेश तळपे,पो.कॉ. सोमनाथ
होले यांनी कामगिरी केली .