शिनोली रवींद्र बोऱ्हाडे
घोडेगाव (ता. आंबेगाव) बसस्थानक परिसरात शनिवारी पोलिसांनी चंदनाची बेकायदा वाहतूक करणारी मोटारसायकल आढळून आली तपासणी दरम्यान १०किलो वजनाचे चंदन सुमारे ७४ हजार रु किमतीच्या चंदनना सह एकास अटक करण्यात यश आले तर एकजण फरार आहे.
घोडेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार बसस्थानक परिसरात दोन जण चंदन घेऊन येणार याची खबर समजता च पो.उपनिरीक्षक किशोर वाजगे .सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक .तानाजी घूले पोलीस हवलदार माणिकराव मुळूक अविनाश कालेकर हे सापळा रचून बसले होते .सकाळी ८.१५ ची सुमारास शिवाजी रामदास भांगे .( वय २१ ) व निलेश जाधव दोघेही राहणार कोळेवाडी . ठाकरवाडी ता.आंबेगाव .जी पुणे .हे मोटारसायकल वर आले . घोडेगाव बसस्थानक समोर पंचायत समिती गेटच्या बाजूला हे चारही पोलीसानी त्यांना हटकले असता त्यांच्या जवळ चंदन आदळून आले असता तितक्यात निलेश जाधव ने तेथून पळ काढला शिवाजी भांगे याला घोडेगाव पोलीस ठाण्यात आणले असता पिशवीत ओले चंदनची सहा लाकडे मिळाली सुमारे १० किलो ८५० ग्रॅम भरले .याची किंमत ५००० रुपयाने याची किंमत सुमारे ७४हजार २४० रू. इतकी झाली .
या दोघांवर महाराष्ट्र चंदनाची झाडे तोडून विक्री करण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जीवन माने याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले व सहायक पोलिस उपनिरीक्षक नवनाथ वायाळ करत आहे.