लोणी काभोर अनिकेत मुळीक
लोणीकाळभोर ता.हवेली:- निखील गुलाब कुंजीर वय २९ वर्ष , धंदा व्यवसाय , रा . कुंजीरवाडी पानमळा , रोड ता . हवेली , जिल्हा - पुणे यांच्या ओळखीचा अश्रफ अमजद सय्यद वय २ ९ वर्ष , रा . वाघेशोरनगर , गोरेवस्ती वाघोली पुणे यास निखील यांनी विश्वसाने ०५ लाख रुपये हे त्यांच्या ओळखीच्या पोपट भोलाजी ढवळे रा . मगरपट्टा हडपसर पुणे यांना देणेसाठी दिले असता. *अश्रफ सय्यद यांनी निखील यांचा विश्वसघात करुन ०५ लाख रुपये पोपट ढवळे यांना न देता ती रक्कम घेऊन तो फरारी झाला* . म्हणुन हा गुन्हा दाखल आहे .
फरारी आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस नाईक देविकर , व पो.शि वीर यांना त्याचे बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की ,०५ लाख रुपायाचा अपहार केलेल्या गुन्हयातील आरोपी पाच महीन्यापासुन स्वताःचे अस्तित्व व ओळख लपवुन फरारी असलेला आरोपी अश्रफ अमजद सय्यद हा वाघोली येथे येणार असल्याचे गोपनिय बातमी मिळाली . त्यांनी हि बातमी पो.उप.नि अमित गोरे यांना कळवले असता त्यांनी मा . वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवले त्यांनी बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी आदेशीत केले . त्यानंतर पोलीस नाईक देविकर यानी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तसेच पोलीस अंमलदार बाजीराव वीर , निखील पवार यांनी माहितीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन तेथे बातमीप्रमाणे अश्रफ अमजद सय्यद हा दिसुन आला म्हणुन पोलीस पकडण्यासाठी गेले असता त्यास पोलीसांची चाहुल लागल्याने तो तेथुन पळुन जावु लागला असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास थोडयाच अंतरावर पकडले . पकडलेल्या आरोपी ला त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अश्रफ अमजद सय्यद वय २९ वर्ष रा . वाघेशोरनगर , गोरेवस्ती वाघोली पुणे असे असल्याचे सांगुन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे . पुढिल तपास पोलीस उप निरीक्षक देशमुख करीत आहे.
उल्लेखनीय कामगीरी मा. अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त पुणे शहर , मा .संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त पुणे शहर , मा. नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मा . नम्रता पाटील , पोलीस उप - आयुक्त , परिमंडळ- ५ मा बजरंग देसाई , सहा . पोलीस आयुक्त हडपसर विभाग राजेंद्र मोकाशी , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , सुभाष काळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पो.उप.नि अमित गोरे , यांचे सोबत पो.ना संभाजी देविकर , अमित साळुंखे , पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव वीर , शैलेष कुदळे , निखील पवार यांचे पथकाने केली आहे .