रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
शिरूर चे निवडणूक प्रभारी पदी लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे व सहप्रभारी पदी भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे याची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असुन भारतीय जनता पक्षाने या निवडणूका गांभीर्याने लढविण्यासाठी कंबर कसली आहे.
आज पुण्यात पुणे जिल्हा भाजपा ची कार्यकारणी ची बैठक जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, भाजपा पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष जालिंदर कामठे , आदींच्या उपस्थितीत शिरुर चे निवडणूक प्रभारी म्हणून लोकनेते आमदार बाबुराव पाचर्णे व सह प्रभारी म्हणून भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्वच निवडणूका पुर्ण क्षमतेने आणि पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा आदेश दिला.
माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रक्रुती अस्वस्थतेमुळे संजय पाचंगे यांच्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच शिरुर च्या सर्वच निवडणूका रंगतदार होणार असुन शिरुर तालुक्यात शिरुर नगरपरिषदेसह भाजपा चिन्हावरच निवडणूक लढविणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.