करिअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त : प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
            करिअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी केले.
            राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  करिअर कट्टा या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे बोलत होते.     
 यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की करिअर कट्टा हा उपक्रम नियमित अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षा व करिअर निवडीसाठी उपयुक्त असल्याने यामधून विद्यार्थ्यांची प्रगती होणार आहे. त्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही याप्रसंगी प्राचार्य डॉ. झावरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशवंत शितोळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांकडे कौशल्य असणे गरजेचे आहे. करिअर कट्टा अंतर्गत यूपीएससी, एमपीएससी, तसेच इतर स्पर्धा परीक्षा तयारी करून घेतली जाते. सायबर सिक्युरिटी, ई फाईल्स सारखे विविध कोर्सेस तसेच करिअर गाईडन्स केले जाते. यातून विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएस अधिकारी, उद्योजक व वरिष्ठ अधिकारी होण्याचीही संधी मिळू शकते असेही शितोळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक डॉ. निता कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस.बी. शिंदे, डॉ. मेघना भोसले, डॉ. योगेश पवार, डॉ. पी. ई. हुंबाड तसेच सर्व प्राध्यापक व १३२ महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निता कांबळे यांनी केले. डॉ.साधना राणे यांनी सूत्रसंचालन केले तर महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक प्रा.तानाजी जाधव यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!