शिरूर प्रमोद कुतवळ
तब्बल दोन वर्षापासून कोरोना काळाने हाहाकार घातल्यामुळे कुठल्याही प्रकारचा वारीचा सोहळा हा पार पाडता आला नाही त्यामुळे आता अगदी उत्साह व आनंददायी वातावरणामध्ये जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी यांच्या वतीने अगदी भव्य दिव्य व अनोख्या प्रकारे बालगोपाळांनी सुरेख व सुंदर असा वारकरी सोहळा संपन्न केला आ .
अनोखी वेशभूषा व लहान चिमुकल्यांनी परिधान केलेले वारकरी संप्रदायाचा वेश अगदी सुंदर व मनमोहक असा होता यामध्ये गळ्यामध्ये घातलेल्या तुळशीच्या माळा, भगवे झेंडे व पताका तसेच आकर्षक सजावटीने तयार केलेली रांगोळी तसेच तुकाराम ज्ञानेश्वर मुक्ताई संत गाडगेबाबा अशा विविध प्रकारच्या गणवेशामुळे एक अनोखे व नयन रम्य सोहळा व तसेच पखवाज विना टाळ मृदंग आदी वाद्यांमुळे व ज्ञानबा तुकाराम या गजरामुळे लहान चिमुकल्यांनी एक सुंदर असे वातावरण तयार केले होते व मनाला मोहित करेल अशी आकर्षक सजावटीची पालखी देखील तयार करण्यात आली होती व सणसवाडी गावामध्ये हा अनोखा सोहळा पूर्ण गावात मिरवणुकीच्या रूपाने या लहानग्याच्या वा वारीला अनोख महत्त्व प्राप्त झाले
सुरुवातीला जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संत परंपरेच्या व संस्कृतीला चालना देणाऱ्या विविध एकपात्री तसेच नाटकांचे समाजाला संदेश देणारे अनोखे विचार विविध नाटिकांमधून लहान मुलांनी सादर केले व त्यात संतांचे वेशभूषा असल्याने त्याला अनोखे महत्त्व प्राप्त झाले होते