सुनील भंडारे पाटील
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून, गट
गण आरक्षण जाहीर झाले आहे, परंतु आरक्षणावर हरकती मागवल्यामुळे राजकीय
हालचालींना मंद गती आली आहे,
वढू
कोरेगाव भीमा गणात आपटी, वडू बुद्रुक, कोरेगाव भीमा, वाडा गावठाण अशी गावी
आहेत, त्याचप्रमाणे सणसवाडी डिग्रजवाडी गणात वाजेवाडी, पिंपळे जगताप,
सणसवाडी,डिग्रजवाडी अशी गावे आहेत, हे दोन गण मिळून एक जिल्हा परिषद
सणसवाडी कोरेगाव भीमा असा गट आहे, यामध्ये वढू कोरेगाव भीमा गणात अनुसूचित
जाती (SC), तर सणसवाडी डिंगरवाडी गणात सर्वसाधारण पुरुष,
त्याचप्रमाणे सणसवाडी कोरेगाव भीमा जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला
असे आरक्षण पडले आहे, या आरक्षणावर सध्या हरकती जमा करण्याचे काम चालू आहे,
त्यामुळे सध्या गटात व गणात राजकीय वर्तुळात हालचाली मंद आहेत, हरकतीवर
सुनावणी झाल्यानंतर राजकीय पटलावर हालचालींना वेग येईल,
आरक्षण
जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये अंतर्गत तयारी जोरदार चालू आहे,
प्रत्येक इच्छुक उमेदवार गटामध्ये व गणामध्ये प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत
आहे, सध्या या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, व भारतीय जनता पार्टी
या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ दुरंगी लढत होण्याची चर्चा
जोरदार चालू आहे, त्यांचे मित्रपक्ष ही सहभागी असतील,
जाहीर
झालेल्या आरक्षणावर जिल्हा परिषद गटासाठी जिल्हाधिकारी, पंचायत समिती गणासाठी तहसीलदार यांचे कार्यालयात
हरकती मागवण्यात आले आहेत, मंगळवार ता 2 ऑगस्ट पर्यंत हरकती नोंदवण्यात येणार आहेत, त्यानंतर आलेल्या हरकतीवर शुक्रवार ता 5 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून त्यानंतर उमेदवारांच्या हालचालींना वेग येईल,