उरुळी कांचन सचिन सुंबे
आळंदी म्हातोबाची (ता हवेली) येथील रहिवासी असलेले शिक्षक व हभप सचिन महाराज माथेफोड यांनी शिताळदेवी नगर येथील वस्ती सुधारण्याचा ध्यास घेतला असुन त्यांना वस्तीतील नागरिक व पुणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी भक्कम साथ दिली आहे. माथेफोड हे एक शिक्षक असुन ज्ञान गंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील विविध गावात काम चालू आहे. आळंदी म्हातोबाची या ठिकाणी रविवार (दिनांक ३१) रोजी शिताळदेवी नगर परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम व आरोग्य शिबीर संपन्न झाले.ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ याठिकाणी प्रत्येक रविवारी विविध सामाजिक उपक्रम पार पाडत असते.प्रत्येक रविवारी या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र येऊन स्वच्छ्ता मोहीम पार पाडत असतात.या रविवारी पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये एकूण १३५ कुटुंब सहभागी झाले होते.तसेच हवेली तालुका पत्रकार संघ,पर्यावरण समिती कुंजीरवाडी,आळंदी म्हातोबा व पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन अखिल भारतीय मराठा महासंघ ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती हवेली तालुका यांच्या हस्ते देशी,आयुर्वेदिक वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी डॉ.रतन काळभोर,डॉ.वनिता काळभोर,डॉ.ओमकुमार हलिंगे,डॉ.विकास बनसोडे,डॉ.सुनील गायकवाड,हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाप्पूसाहेब काळभोर,तुळशीराम घुसाळकर,विजय काळभोर,आळंदी म्हाताबोची ग्रामसेवक पी.एस.पवार,सोरतापेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष माऊली लाड,संतोष लांजवडे,संदीप शिवरकर,महेश गायकवाड,सुभाष जवळकर,माऊली जवळकर,भाऊसाहेब जगताप,हरेश गोठे,शिवाजी जवळकर,रवी दगडे,पप्पू सुर्वे, रिहान तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वनिता काळभोर यांनी सांगितले की ज्ञान गंगाच्या माध्यमातून सचिन माथेफोड व त्यांचे सहकारी समाजासाठी विविध उपक्रम राबवित असून आमचे सर्व डॉक्टर वेळोवेळी सहकार्य करत असुन समाजिक कार्यासाठी पुर्व हवेली डॉक्टर असोसिएशन नेहमी मदत करणार आहे. यावेळी हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी सांगितले की शिताळदेवी नगर मध्ये राहत असणाऱ्या वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबत असणारी जागरूकता निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायक असून, स्वतःच्या आरोग्यासोबतच सार्वजनिक आरोग्य देखील याठिकाणी जपले जात आहे.आमचे सहकारी प्रा. सचिन माथेफोड यांच्या मार्गदर्शनाखाली अजून चांगल्या प्रकारचा विकास या नगराचा होत जावो.