उरळीकांचन सचिन सुंबे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन केले. परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते .त्यावेळी शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन काम करत होते.त्यामुळे स्थानिक पातळीवर वातावरण जोमात होते. येणाऱ्या जिल्हा परिषद वं पंचायत समितीच्या निवडणूका जवळ आल्यामुळे स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांनी चंग बांधला होता. पंरतु राज्य पातळीवर बरीच उलथापालथ झाल्यामुळे सध्या इच्छुकांसह कोरेगाव गणात शांतता मय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी कोरेगाव मुळ गणात वर्चस्व स्थापित करणार याकडे लक्ष लागले आहे . पंचायत समितीच्या रचने नुसार या कोरेगाव मुळ गणाची नवीन निर्मिती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे या गणात वर्चस्व असून भाजपचे सुध्दा या गणात प्राबल्य आहे. मागील निवडणूकी मध्ये मुळामुठा नदीच्या अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा तर पलीकडे भाजपचा उमेदवार निवडुन आले होते. नंतर शिवसेनेने सुध्दा मोर्चे बांधणी केली होती. त्यामुळे आता कोण होणार या गणाचा सदस्य व या गणात काय आरक्षण पडते या कडे सर्व नागरिकांनाचे लक्ष लागले आहे.
हा गण जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब ,माजी उपमुख्यमंत्री अजित दादा , खासदार सुप्रिया सुळे ,डॉ. अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार यांना मानणारा असुन राज्य पातळीवर कितीही उलथापालथ झाली तरी या गणात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार आहे.
सुरज चौधरी
माजी सरपंच पेठ गाव