*महाविकास आघाडी तुन बाहेर पडा...! विजय शिवतारेंचा चा सल्ला*

Bharari News
0

लोणी काळभोर अनिकेत मुळीक

          शिवसेना पक्ष आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण कुटुंब प्रमुख या नात्याने बंडखोर आमदार आणि इतर सर्वांच्या भावना लक्षात घ्याव्यात आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असं आवाहन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते.
               पुरंदर तालुक्यातील दिवे येथील प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय बाजारही राष्ट्रवादीने रद्द करण्यात यशवंत सहकारी साखर कारखान्याची जागा निश्चित केली. हवेली तालुक्यातील फुरसुंगी-उरुळी पाणी नियोजन सडवली, महापालिकेची वॉर्ड रचना राष्ट्रवादीला अनुकूल करून घेताना सेनेच्या सूचनांना केराची टोपले दाखवली गेली. प्रचंड त्रास देऊन राष्ट्रवादीने जिल्ह्यात सेना संपवण्याचा जणू विडाच उचलला आहे, असं म्हणत विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!