हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
वारकरी संप्रदायाच्या पताका संपूर्ण भारतभर फडकत ठेवणारे नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा महाराष्ट्र, पंजाब, राजस्थानसह संपूर्ण भारतात संपन्न झाला
श्री विश्वसंत नामदेव महाराज यांचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा पुणे, पिंपरी, चिंचवड शहरातील शिंपी समाजाच्या ज्ञाती संस्थानी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला.
यामध्ये प्रामुख्याने नामदेव समाजोन्नती परिषद या शिखर संस्थेसह नामदेव अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कसबा पेठ, बुधवार पेठ, नागेश पेठ, लष्कर विभाग, कोथरुड, गोखलेनगर, दक्षिण विभाग, हडपसर, येरवडा, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, सांगवी या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ज्ञातीसंस्थेत ठिकठिकाणी नामदेव महाराज यांच्या मूर्तीची महापूजा करून हरिपाठ, भजन, कीर्तन, नामदेव आरतीसह विठूनामाचा गजरा झाला. यानिमित्ताने इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पद्व्युत्तर विद्यार्थ्यांचा सत्कारासह कसबा पेठ संस्थेने अॅड. प्रकाश सिंदेकर कुटुंबियांनी पुरस्कृत केलेला "एकरत्न पुरस्कार" तसेच वयाची ६१, ७५, ८१ व ९१ वर्ष पुर्ण करणारे व ज्यांचे विवाह बंधनास २५, ५० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा दांपत्याचा विशेष सन्मान अशा भरगच्च कार्यक्रमांची आखणी कारण्यात आली होती.
या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने नामदेव समाजोन्नती परिषद कार्यालयात नामदेव गाथेच्या अभंगांचे गायन केले. संत नामदेव महाराज हे केवळ महाराष्ट्रपुरतेच मार्यदित नव्हते तर त्यांनी पंजाब पर्यंत भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. या नामदेव समाजोन्नती परिषदेचे वतीने भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी दि.४ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२२ अशी २१ दिवसांची पंढरपूर ते घुमान (पंजाब) अशी भव्य सायकल वारीचे अयोजन सुद्धा करण्यात आले.
श्री संत नामदेव शिंपी समाज, दक्षिण विभाग या संस्थेच्या रोप्यमोहत्सवी वर्षानिमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची चांदीची प्रतिमा संस्थेतर्फे अल्पदरात उपलब्ध करून दिल्याचे अध्यक्ष मोहन गाढवे यांनी जाहीर केले. तर बुधवार पेठ संस्थेने दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन केले.
कारगील विजय दिनाचे औचित्य साधून कसबा पेठ पुणे येथील संजीवन समाधी सोहळ्यास सेवानिवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांनी नवीन पिढीनी देशसेवेसाठी लष्करात भरती होण्यासाठी अवाहन केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष मा. श्री रमेश मेहेर यांना अध्यक्षीय पुरस्काराने तर श्री. संदीप लचके, श्री जितेंद्र कळसकर व शिल्पकार अशोक काळे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संत नामदेव सेवा संघ हडपसर यांनी वसंतराव खुर्द यांना समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले तर नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे, मुख्य विश्वस्त श्री रामचंद्र मेटे, सरचिटणीस डाँ अजयजी फुटाणे, पुणे विभागीय उपाध्यक्ष श्री संजयजी नेवासकर, याचेसह मंदिर विनामूल्य व्यवस्था पाहणारे श्री सुदाम सुपेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नागेश पेठ संस्थेच्या मारुती मंदिरातील जीर्णोद्धार कामासाठी आर्थिक मदत करणारे श्री विजय पाटसकर, श्री सुरेश सातपुते आणि श्रीमती शोभा हेंद्रे याचा सत्कार करण्यात आला करण्यात आला.
आकुर्डी-निगडी व भोसरी संस्थेच्यावतीने पालखी सोहळ्याचे उत्तम व शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले तर येरवडा संस्थेच्या वतीने नामदेव महिला परिषद दिग्दर्शक सांस्कृतिक व लिखित नाट्य सादरीकरण करण्यात आले.
सर्व ठीकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.