सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र अनेक दिवसांच्या ओढीनंतर पावसाची दमदार हजेरी लागली, दोन दिवसापासून चाललेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला, तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने सर्वत्र हजेरी लावली, पाऊस सुरू होण्याची चाहूल लागल्यानंतर शेतकऱ्यांनी भराभर शेतीची कामे उरकत खरिपाची पेरणी देखील करून घेतली, गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये ग्रामस्थ नागरिक व शेतकरी पावसाच्या आगमनाची वाट पाहत होता, वातावरण देखील अतिशय उष्णतामय झाल्याने, घायाळ झालेल्या जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना उशिरा का होईना परंतु दिलासा मिळाला, यावेळी पहिल्या वळवाच्या पावसाने तर दडीच मारली, मोसमी पावसाने एक महिना उशिरा हजेरी लावल्याने मध्यंतरी लोकांच्या मनावर वाढलेला ताण कमी झाला, ज्ञानोबा - तुकाराम पालखी सोहळा पंढरपूर कडे जाताना कधीही कोरडा जात नाही, वारकरींच्या पुण्याईने पाऊस हा होतोच, आणि यावर्षीही झाला, आज सर्व पालख्या पंढरपूर मुक्कामी विसावल्या त्या आधीच पावसाने मात्र हजेरी लावली, पावसाच्या आगमनाने पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले असून आभाळाकडे लक्ष लागलेला शेतकरी मात्र सुखावला,