शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
पुणे शहरात आज बुधवार (दि.२७ जुलै) रोजी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.
पुणे शहरातील कोथरूड, स्वारगेट, डेक्कन, मनपा, येरवडा, विश्रांतवाडी, चंदननगर, खराडी परिसरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारगड अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सुमारे १५ दिवसाच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पौड रोड, फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड तसेच पुणे-नगर मार्गावर येरवडा, रामवाडी येथे रस्त्यावरून पाणी वाहत होते. तसेच सखल भागात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना दुचाकी चालविताना कसरत करावी लागत होती. अचानक आलेल्या पावसाने ठिक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.