सुनील भंडारे पाटील
वढू खुर्द (तालुका हवेली ) येथील माळरानावर चरण्यासाठी गाई गेले असता, खड्ड्यामधील पाणी पिण्यासाठी गेल्याने जोराचा विद्युत धक्का बसल्याने चार गाई जागीच मृत्युमुखी पडल्या, यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, विद्युत महावितरण कंपनीने तातडीने विद्युत पुरवठा बंद करावा, व दुरुस्ती करावी नाहीतर संबंधित ठिकाणी भविष्यात मोठी घटना घडू शकते,
वडू खुर्द गावांमधील शेतकरी अशोक भोंडवे यांची 40 ते 50 गायींची गोशाळा आहे, सध्या पाऊस चांगला झाल्याने माळरान आणि डोंगराच्या कडेला चारा, व हिरवळ चांगली असल्यामुळे लोणीकंद पुणे नगर महामार्गावरून आळंदी फाट्याच्या पुढे आळंदी व वडू खुर्द या तीकाटण्याजवळ समोरील डोंगराकडे जाताना, अति विद्युत पावरच्या खांबामुळे विद्युत प्रवाह शेजारील लोखंडी कंपाऊंड मध्ये उतरला, परिणामतः कंपाऊंडला खेटून असणाऱ्या पाण्याच्या डबक्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने गाई पाणी पिण्यासाठी गेल्या आणि विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसल्याने चार गाई जागीच मृत्यू पावल्या,
महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, यानंतर एखादी मोठी घटना घडू नये म्हणून महावितरण कंपनीने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे,