लोणी काळभोर अनिकेत मुळीक
जनतेतून सरपंच अशी जोरदार मागणी आता राज्यातील संरपंचांकडून होऊ
लागली आहे.१२ हजार ग्रामपंचायतीच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर थेट निवडीच्या मागणीसाठी सरपंच नव्या मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची तयारी करू लागले
आहेत.
थेट सरंपच निवडीचा निर्णय
युती सरकारच्या काळात झाला होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस व ग्राममविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला होता. मात्र
महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवड होण्याचा आग्रह धरला. त्यानंतर थेट
सरपंच निवडीची पद्धत बंद करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व
उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेण्यासाठी राज्यातील सरपंचांकडून
तयारी सुरू आहे. आधीच्या थेट सरपंच निवडीच्या प्रक्रियेत काही त्रुटी
असल्यास दूर करा.पण पद्धत पुन्हा लागू करा,अशी मागणी सरकार कडे केली जाणार
आहे. दुसऱ्या टप्प्यात १२ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील.
परिषदांना
देखील लागू आहे. मात्र ग्रामपंचायतींना हा कायदा लागू नाही त्यामुळे गावात
होणारी भांडणे अस्थिरता वातावरण तयार होते थेट सरपंच निवडीचा पद्धतीमुळे
गावे राजकीय दृष्ट्या स्थिर होतील...
- जयंत पाटील-कुडूकर, अध्यक्ष, अखिल भारतीय संरपंच परिषद