सुनिल भंडारे पाटील
करंदी ता. शिरूर येथील नप्तेवस्ती येथे एका शेतकऱ्याच्या गायला
सर्पदंशाची दुर्दैवी घटना घडल्यानंतर पोलीस पाटील व सर्पमित्रांनी पशु
वैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने मोठे प्रयत्न केले असून गायची प्रकृती सध्या
स्थिर असल्याने पोलीस पाटील व सर्पमित्रांच्या धडपडीचे अनेकांनी कौतुक केले
तर गाय मालकाने देखील आनंद व्यक्त केला आहे.
करंदी ता. शिरूर येथील नप्तेवस्ती येथील महेश नप्ते यांच्या
गोठ्यातील गाय सकाळच्या सुमारास बेशुध्द पडल्याचे निदर्शनास आले त्यामुळे
पशु वैद्यकीय डॉ. प्रभाकर ढोकले यांना उपचारासाठी बोलावले असता सदर गायला
सर्पदंश झाल्याचे दिसून आले, मात्र यावेळी सर्पदंशवरील लस कोठे उपलब्ध
नव्हती मात्र पोलीस पाटील वंदना साबळे यांनी खबरदारी साठी सर्पदंश वरील लस
आणून ठेवल्या असल्याचे एका मेडिकल मधून नप्ते यांना समजले, त्यांनी तातडीने
वंदना साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने दोन लस उपलब्ध
करून दिल्या मात्र गायसाठी अजून दोन लसची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी
सांगितले, याबाबतची माहिती साबळे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे सर्पमित्र
शेरखान शेख यांना दिली दरम्यान शेरखान शेख यांनी शिक्रापूर ग्रामीण
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांच्या मदतीने सर्प
दंशावरील लस उपलब्ध करून घेत सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर
यांनी करंदी गाठले, यावेळी पशुवैद्यकीय डॉ. प्रभाकर ढोकले यांच्या मदतीने
सदर गाय वर उपचार सुरु केले काही वेळाने गायने उपचारास प्रतिसाद देण्यास
सुरवात केली, यावेळी पोलीस पाटील वंदना साबळे, माजी सैनिक धनंजय धोत्रे,
सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर राघू
नप्ते, अशोक शेळके, चंद्रकांत नप्ते, राघू नप्ते, शंकर टेमगिरे हे उपस्थित
होते, काही वेळाने गाय धोक्यातून बाहेर आली असल्याचे पशुवैद्यकीय डॉ.
प्रभाकर ढोकले यांनी सांगितले. तर यावेळी पोलीस पाटील व सर्पमित्रांनी
आमच्या गायच्या उपचारासाठी मोठी धडपड केली असल्याचे सांगत गायमालक महेश
नप्ते यांनी सर्वांसह पशु वैद्यकीय डॉक्टरांचे आभार मानले.
गायची प्रकृती स्थिर आहे- डॉ. प्रभाकर ढोकले ( पशुवैद्यकीय डॉक्टर )
करंदी
येथे गायला साप चावल्यानंतर पोलीस पाटील व सर्पमित्रांनी तातडीने सर्प
दंशावरील लस उपलब्ध करून दिल्याने गायवर वेळेवर उपचार करता आले असून सध्या
गायची प्रकृती स्थिर असून पुढील दोन दिवस पुन्हा गायची तपासणी करून उपचार
केले जाणार असल्याचे पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. प्रभाकर ढोकले यांनी सांगितले.
पोलीस पाटील व सर्पमित्रांचे मोठे योगदान ( डॉ. वैजनाथ काशीद )
करंदी
येथे गोमातेला सर्पदंश झालेला असताना त्या गोमातेला वाचविण्यासाठी
सर्पमित्रांनी मोठे कष्ट घेतले, गोमातेला जीवदान मिळवून देण्यासाठी पशु
वैद्यकीय डॉक्टरांबरोबरच पोलीस पाटील व सर्पमित्रांचे काम महत्वाचे
असल्याचे ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ काशीद यांनी
सांगितले.