लोणी काळभोर अनिकेत मुळीक
शेवाळेवाडी बस आगारातून लोणी काळभोर नागरिकांना प्रवासाची सुविधा मिळण्यासाठी अजून एक बस सेवा सुरु करावी असे निवेदन देण्यात आले.
लोणी काळभोर (ता हवेली ) शेवाळेवाडी येथील बस आगाराच्या वतीने हडपसर ते लोणी काळभोर, रामदरा रोड या मार्गावर दर एक तासाचे अंतराने अजून एक अतिरिक्त बस सेवा सुरू करण्यात यावी असे निवेदन शेवाळेवाडी बस आगारप्रमुख सुरेंद्र दांगट यांना दिले आहे.
यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी राजेंद्र काळभोर सदस्या ज्योती अमित काळभोर, सविता गिताराम लांडगे उपस्थित होत्या.