शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
शिक्रापूरचे कृषी सहायक अशोक जाधव यांना जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आला,
महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प आयोजित नारायणगाव येथील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जाधव यांचा सन्मान करण्यात आला. पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपशॉप अंतर्गत सन २०२१- २२ मध्ये शेतकऱ्यांची शेतीशाळा राबविण्यामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना माती परीक्षण, बियाणे निवड, बीज प्रक्रिया, पेरणी पद्धत, विविध किडीची ओळख, खत व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास राजगुरुनगरचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, तालुका कृषी अधिकारी शिरूर सिद्धेश ढवळे तसेच उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,