लोणी काळभोर अनिकेत मुळीक
घरात कोणीही नाही यांची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी २५ तोळे सोन्याचे दागिने, ३०० ग्रॅम चांदीसह २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६ लाख ६४ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.
या प्रकरणी सुहास सुधाकर बोरकर (वय ४५, रा. फ्लॅट नंबर ०८, श्री कॉम्प्लेक्स, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली. मूळ रा. बोरकरवस्ती, पांढरीमळा रोड लोणी काळभोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास बोरकर हे शुक्रवार (१ जुलै) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास राहत्या घराला कुलूपलावून पुण्यामध्ये गेले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी निता घरी आल्या.घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता त्यांना बेडरूममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. बेडमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम देवघरातील चांदीच्या तीन मूर्ती दिसून आल्या नाहीत. सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच देवघरातील चांदीच्या तीन मूर्ती चोरी करून नेल्या असल्याची खात्री झाली असता.एकूण ६ लाख ६४ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला असल्याची फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.पुढील तपास चालू आहे.