शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी निलेश काशीद तर कार्यवाहपदी महेश शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- निलेश काशीद - अध्यक्ष (जुन्नर), महेश शेलार - कार्यवाह (शिरूर), भाऊसाहेब खोसे - उपाध्यक्ष (मावळ), रामहरी लोखंडे - उपाध्यक्ष (इंदापूर), उत्तम खेसे - उपाध्यक्ष (खेड), जितेंद्र कुमार थिटे - उपाध्यक्ष (शिरूर), संजीव मांढरे - कार्याध्यक्ष (शिरूर), प्रमोद काकडे - कार्याध्यक्ष (दौंड), कैलास शिंदे - कोषाध्यक्ष (जुन्नर), नितीश पवार - संघटन मंत्री (शिरूर), अरुण साळुंके - कार्यालय मंत्री (खेड), उर्मिला मांढरे - महिला आघाडी प्रमुख (शिरूर), मधुमिलिंद मेहंदळे - कार्यकारिणी सदस्य (भोर), राजेंद्र जाधव - कार्यकारिणी सदस्य (इंदापूर), गणेश पाटील - कार्यकारणी सदस्य (मावळ), प्रकाश वाढवणे - कार्यकारणी सदस्य (शिरूर). नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.