श्री क्षेत्र पिसेला आषाढी आमावस्यानिमित्त गर्दी

Bharari News
0
सासवड बापू मुळीक 
        श्री क्षेत्र पिसे (.ता .पुरंदर) येथे आषाढी आमवास्यानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांनी देव दर्शनासाठी गर्दी केली होती . अलोट भक्तांमुळे  मंदिर व मंदिर परिसर भक्तिमय होऊन गेला होता . 
गेल्या आठवड्यात संततधार होती . मात्र आता मेघराजानेही असंत दिल्यामुळे श्रीनाथांच्या दर्शनाला लोक आले होते . पहाटे पूजा होऊन गाभारा बंद केला , नंतर ७ व मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला केला . भाविकां तर्फे देवाला अभिषेक करण्यात आले . दहिभाताची पूजा भाविकांनी बांधली . दुपारी १२ वाजता देवाची धुपारती होऊन गाभारा बंद केला . दुपारी १.३० नंतर गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला केला . 
गावचे पहिला अनंतराव आप्पा मुळीक यांनी देवस्थानामार्फत भाविकांसाठी आषाढी आमावास्येनिमित्त सर्व प्रकारची सेवा सुविधा दिली . संघ्याकाळी ७ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरापासून पूर्ण गावाला पालखीचे लक्ष्मी माता परिसर , तुकाई देवी परिसर , एस.टी  स्टॅन्ड पर्यंत पालखीचे प्रदक्षिणा करण्यात आल्याचे पुजारी विट्टल गिरीगोसावी यांनी सांगितले .
तीर्थप्रसादाचे आयोजन उपसरपंच सीमा मुळीक ,उद्योगपती संतोष मुळीक ,योगेश मुळीक ,संदीप कुतवल ,रमेश मुळीक , प्रकाश आ मुळीक , भाऊसो मुळीक ,संजय मुळीक , रामदास मुळीक , पंडित मुळीक यांनी केले तर या वेळी सरपंच रोहन मुळीक , माजी .उपसरपंच शांताराम मुळीक , माजी सरपंच दीपक मुळीक , ग्रा. पंचायत सदस्य युवा कार्यकरते जेष्ट नागरिक महिला सोसायटीचे सर्व सदस्य ग्रामस्त आदी . उपस्तित होते . अशी माहिती उद्योगपती संतोष हरिभाऊ मुळीक यांनी दीली .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!