सुनील भंडारे पाटील
आज पुन्हा लागली ५०० देशी झाडे माहिती सेवा समिती, पिंपळे जगताप ग्रामस्थ व ईतर सहयोगी संस्था, वृक्ष मित्र, शिरूर हवेली तालुक्यातील अनेक संस्थांवर काम करणारी दानशूर व्यक्ती, उद्योजक या सर्वांचे सहकार्याने तसेच पिंपळे जगताप गावचे सुपुत्र माहिती सेवा वृक्षसंवर्धन समितीचे शिरूर तालुका अध्यक्ष श्री धर्मराज बोत्रे यांचे माध्यमातून गेले २ आक्टोंबर पासून वृक्षारोपण चालू आहे आज अखेर त्याठिकाणी ११००० झाडांचे वृक्षारोपण केले आहे व त्याचे संगोपन नियमित चालू आहे.
आज पिंपळे जगताप येथील जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा व महाराज सयाजीराव गायकवाड विद्यालय येथील
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ५०० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले,
मोठ्याप्रमाणात ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे जगताप गुरुजी
यांनी गावातून वनराई प्रकल्पात पर्यंत वृक्ष दिंडी आनली होती त्याचे स्वागत
ग्रामस्थांचे माध्यमातून करण्यात आले माहिती सेवा वृक्षसंवर्धन समिती व
ग्रामस्थ पिंपळे जगताप यांचे माध्यमातून अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी
सर्वांचे स्वागत अभार मानले व माहिती सेवा समितीचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत
वारघडे यांनी यापुढे झाडे का लावली पाहिजे त्याचे महत्त्व याबाबत
विद्यार्थ्यांशी संवाद साधला.वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपल्यानंतर
वनबोजनाचा कार्यक्रम ठेवला होता सर्व विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी त्याचा
लाभ घेतला.कार्यक्रमाची सांगता झाली.
ऊद्या दि.३ जुलै २०२२ रोजी १५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे असे
धर्मराज बोत्रे - अध्यक्ष माहिती सेवा वृक्षसंवर्धन समिती शिरूर तालुका. यांनी सांगितले,