सुनील भंडारे पाटील
सणसवाडी ( ता.शिरूर) येथे मयुरी रेसिडेन्सी येथे ५ वी ते १२ च्या क्लासचे उद्घाटन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित कलासासारखीच सुविधा मिळत असल्याने ५ वी ते १२ च्या क्लास साठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद. प्रत्येक विषयासंबंधी तज्ञ शिक्षकांचे वैयक्तिक पूर्णवेळ मार्गदर्शन, विषयानुरूप अद्ययावत नोट्स,प्रश्नसंच व टेस्ट , प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र कौंसलिंग, स्पर्धा परीक्षा ,नीट या परीक्षांची ८ वी पासून सर्वांगीण तयारी करून घेणार असल्याने सणसवाडी सारख्या गावात शहरातील नामांकित क्लासच्या सुविधा मिळत असल्याने पालक व विद्यार्थी आनंदात असून मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी गर्दी करताना दिसत आहेत .
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी क्लास सुरू करण्यात आल्याचे क्लासचे संस्थापक अमोल दरेकर यांनी सांगितले.
आई वडिलांच्या संस्कारामुळे व शिस्तीमुके मी आज माझे करियर घडवू शकलो. अभ्यास करून मार्क्स मिळवणे याचबरोबर इतर क्षेत्रात आपण आपला ठसा उमटवून नावलौकिक मिळवला हवे.आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जात आपण , राग, चीड ,अपयश यांच्यावर मत करत उज्वल आयुष्य घडवायला हवे.शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्यात आहे या जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्यासाठी मेहनत ,जिद्द ,सातत्य व नम्रता आवश्यक असल्याचे मत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले.