सासवड बापू मुळीक
सासवड (ता पुरंदर)आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांचे संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे यांची १२४ वी जयंती आणि २४ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलना चे आयोजन दिनांक १३ व १४ ऑगस्ट रोजी सासवड येथे केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते,सचिव शांताराम पोमण व साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ऍड.अण्णासाहेब खाडे,कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान,उपाध्यक्ष बंडूकाका जगताप यांनी दिली.
सासवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात संमेलन होणार आहे . दिनांक १३ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठान मधील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. संमेलनाचे उदघाटन श्रीरामपूर चे आमदार लहू कानडे यांचे हस्ते शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार असून , कोल्हापूर येथील जेष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे हे संमेलनाध्यक्ष आहेत. स्वागताध्यक्षपदी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत यशवंत ताकवले यांची निवड झाली आहे. उदघाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप ,माजी आमदार अशोक टेकवडे ,पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे उपस्थित रहाणार आहेत . सायंकाळी ६.३० ते ९ या वेळात कवी संमेलन होणार असून जेष्ठ कवी उद्धव कानडे कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत .डॉ.स्वप्नील चौधरी ,सागर शिंदे स्वाती बंगाळे ,बबन धुमाळ हनुमंत चांदगुडे ,भरत दौंडकर ,नीता खरे यांचे सह स्थानिक कवीं राजगौरी जाधव ,केशव काकडे ,अनिल कदम ,अभिषेक अवचार ,प्रसन्नकुमार धुमाळ ,राजेंद्र सोनावणे ,विद्या जाधव ,अक्षय कोलते, गौरव नेवसे, प्रशांत बोरा यांचा सहभाग आहे ,या प्रसंगी कै.सोपानराव लांडगे यांच्या समरणार्थ सन २०२२ या वर्षातील काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल . रविवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळात "आचार्य अत्रे यांच्या साहित्यातील जीवन मूल्य या विषयावर परिसंवाद होईल मसाप च्या कोषाध्यक्ष डॉ सुनिताराजे पवार प्रमुख पाहुण्या आहेत. प्रा बाळासाहेब लबडे (गुहागर )प्रा डॉ संदीपान नवगिरे (अंबरनाथ )प्रा. वि. दा. पिंगळे (पुणे )प्रा किरण गाढवे (सासवड) यांचा सहभाग असून शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ . अरुण कोळेकर संयोजन करतील
दुपारी १२ ते १. ३० या वेळात जेष्ठ विधिज्ञ ऍड उल्हास बापट यांची "प्रचलित न्यायव्यवस्था "या विषयावर ऍड दिलीप निरगुडे प्रगत मुलाखत घेतील सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड धंनजय भोईटे यांची प्रमुख उपस्थिती आहे . दुपारी १. ३० ते ३. ३० या वेळात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. जेष्ठ हास्य कलाकार मकरंद टिल्लू व हर्षदा टिल्लू यांचा "हसण्याची बाराखडी "हा कार्यक्रम होईल . साहित्य परिषद सासवड शाखेचे कार्यालयीन चिटणीस शिवाजी घोगरे ,वसंत ताकवले यांचे नियोजन असून केशर यादव ,आरती पवार या सूत्रसंचालन करणार आहेत. साहित्य संमेलनास मान्यवर रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.