विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Bharari News
0
सासवड बापू मुळीक
      पुरंदर तालुक्यातील माजी आमदार व माजी राज्यमंत्री नेते विजय शिवतारे यांचीही आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.    
तर त्यांचे शिवसेनेतील सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शिवताऱ्यांच्या हकालपट्टीची माहिती 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे.
विजय शिवतरे यांनी आज पुरंदर हवेलीतील शिवसेनेचे सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, गावोगावचे शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गणप्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व इतर अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी यांची बैठक पुरंदरेश्वरा या निवासस्थानी बोलवली होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!