रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
रांजणगावातील महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेला जनजागृती दिंडी सोहळा यावर्षी उत्साहात पार पडला. संस्थेचे
संस्थापक अध्यक्ष डॉ विकास शेळके, संस्थेचे सचिव प्रकाश शेळके, महागणपती
ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अरविंद गोळे ,महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे
सुपरवायझर निलेश फापाळे, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपप्राचार्य
अबेदा आत्तार , अक्षरनंदन गुरुकुल स्कूल प्राचार्य वंदना खेडकर , श्री
महागणपती ग्लोबल स्कूलच्या सोनाली नलावडे यांच्या हस्ते पालखी पूजन
करण्यात आले.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल ,रुक्मिणी,
ज्ञानेश्वर, सोपान ,निवृत्ती ,ज्ञानदेव, मुक्ताबाई यांसारख्या वेशभूषा
केल्या होत्या. झांज ,लेझीम ,टाळ, फुगडी असे अनेक पारंपरिक प्रकार यावेळी
विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच काही विद्यार्थ्यांनी कीर्तन ,प्रवचने,
अभंग सादर केले . या प्रसंगी वाघाळे ता. शिरुर येथील बाल किर्तनकार ह.भ.प.
कार्तिक महाराज राजेंद्र शेळके यांनी किर्तनसेवा सादर केली. लहानग्या मुलांमधील उत्साह पाहून संस्थेचे सचिव श्री. प्रकाश शेळके यांनी मुलांचे कौतुक केले.