राज्य सरकारने आरोग्य व शैक्षणिक खात्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज

Bharari News
0
 सुनील भंडारे पाटील
             समाजामध्ये सद्यस्थितीमध्ये आरोग्य व शैक्षणिक खात्याचे अनेक वर्षांपासून संतुलन बिघडले असून सर्वसामान्य व गोरगरीब जनता पूर्णपणे वैतागली आहे, अतिरिक्त दर यामुळे खर्च न करण्याची क्षमता नसल्याने जात आहेत प्राण, हुशार मुले शिक्षणापासून वंचित,           
शहरे तसेच ग्रामीण भागामध्ये समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक आरोग्य, माणसाची परिस्थिती कशी असो कुठल्याही आजाराने मनुष्य ग्रासला तर त्याला हॉस्पिटलचे दरवाजे झिजवावी लागतात, खाजगी रुग्णालयावर गंभीर आजार की ज्या आजाराने त्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो, परंतु त्या रुग्णाची खर्च करण्याची ऐपत नसते, शिवाय पैसे उकळण्या कामी त्याला शासकीय योजनांची माहिती दिली जात नाही, आणि परिणामतः हॉस्पिटलचा भरमसाठ दर व रुग्णाची आर्थिक परिस्थिती नाजूक यामुळे जीव जातो याकडे लक्ष देण्याची गरज आहे,            
समाजामध्ये शिक्षणाला अनन्य साधारण महत्व असताना खाजगी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी पालकांकडून भरमसाठ फी उकळली जाते हे फ्याड गेल्या काही मोजक्या वर्षापासून समाजामध्ये तयार झाले
आहे, शिक्षणाचे बाजारीकरण होऊन शैक्षणिक संस्था हा एक व्यवसाय (धंदा) झाला आहे,त्यामुळे सर्वसामान्य व गरीब मुलांना हुशारी असून देखील शिक्षणापासून वंचित राहावे लागते त्यामुळे राज्य सरकारने समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या आरोग्य व शैक्षणिक खात्याकडे लक्ष देऊन सर्वसामान्य व गरीब जनतेला होणाऱ्या मानसिक त्रासापासून मुक्त होण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी चर्चा सध्या समाजामध्ये जोर धरत आहे,

  

 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!