हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट 6 मध्ये कार्यरत पोलीस
अंमलदार ऋषिकेश व्यवहारे यांना पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या
हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले, पुणे ग्रामीण आणि पुणे शहर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकात
त्यांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी उत्तम कामगिरी केली आहे मे महिन्याच्या
कालावधीत ऋषिकेश व्यवहारे यांनी एकूण चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून
सहा लाख 40 हजार रुपये किमतीची एकूण 28 दुचाकी वाहने जप्त केल्या असून
पुणे शहर पुणे ग्रामीण मुंबई नागपूर येथील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले
आहेत दबंग पोलीस अंमलदार तसेच
गुन्हेकरांचा कर्दनकाळ अशी ओळख असणारे ऋषिकेश व्यवहारे यांनी या अगोदर पुणे
ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना दहशतवादी विरोधी पथक लोणीकंद पोलीस
ठाणे गुन्हेशोध पथक येथे अनेक गुन्ह्यांची उकल करून पोलीस दलाची प्रतिमा
उंचावली आहे त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना पदान
करण्यात आला,यावेळी पुणे पोलीस आयुक्त यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे
रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे उपस्थित होते या
पुरस्काराबद्दल व्यवहारे यांच्यावर तालुक्यातील विविध मान्यवरांकडून
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,