न्हावरा : सुजित मैड
निर्वी ता. शिरूर येथे बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली मौलाना पप्पू शेख यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदानात नमाज पठण करण्यात आले त्यावेळी त्यांनी बकरी ईद चे महत्त्व सांगत असताना इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत इब्राहिम अलैह सलाम यांना अल्लाहने स्वतःच्या आवडत्या वस्तूंचा त्याग करण्याचा आदेश दिला होता,
अल्लाहाच्या या आदेशानुसार हजरत इब्राहिम यांनी त्यांची आवडती व्यक्ती त्यांचे सुपुत्र हजरत इस्माईल यांचा त्याग करण्याची वृत्ती अल्लाहच्या पसंतीत उतरली त्यावेळी हजरत इस्माईल यांना वाचवण्यासाठी अल्लाहने त्यांच्या जागी बकऱ्याला ठेवले त्यावेळी बकऱ्याची कुरबानी देण्यात आली असे आपल्या प्रवचनात सांगितले तसेच अल्लाहाकडे सामूहिक दुवा मागितली भारत देशात सामाजिक आणि धार्मिक सलोखा शांतता म्हणून सामूहिक दुवा मागण्यात आली यावेळी परिसरामधील वडगाव रासाई, निमोणे, गुनाट, शिरजगाव काटा , धुमाळवाडी परिसरातून मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी आले होते. यावेळी राष्ट्रीय मानवअधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत चे शिरूर शहराध्यक्ष शकील भाई मणियार, सलीम शेख, नाजीम पठाण, इनुस पठाण, शफिक पठाण,बशीर भाई पठाण, भैय्या मणियार ,सिराजभाई मणियार, सलमत शेख, हसन शेख, अकबर शेख, इस्माईल मणियार, याकूब भाई मणियार, अश्फाक अत्तार, रमजान इनामदार, अजमेर शेख, इरफान शेख आदीसह मुस्लिम बांधव उपस्थित होते,