सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
पिंपळनेर येथून निघालेल्या संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे इंदापुर येथे आगमन होऊन तुकाराम महाराज व निळोबाराय या गुरु शिष्यांची दुपारी भेटीचा सोहळा होऊन दिंडी सरडे वाडी येथे मुक्कामी निघाली .
उद्या टेंभुर्णी मध्ये रींगण होऊन पालखी पुढे परिते करकंभ भोसे गुरसाळे मार्गे एकादशीला पंढरपुरला पोहचेल . विठ्ठलाचे भेटीला दोन वर्षानंतर निघालेल्या वारकर्यांचा उत्साह व ज्ञानदेव तुकारामचे गजरात वारकर्यांचा प्रवास उन वारा पावसाची तमा न बाळगता पंढरपुरचे दिशेने चालू आहे .