लोणी काळभोर अनिकेत मुळीक
तृतीपंथीयांची पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड केली आहे. ग्रीन मार्शल आणि महानगर पालिकेत तृतीयपंथीना कंत्राट पद्धतीने नोकरीवर घेतलं आहे.
समाज विकास विभागामार्फत हा उपक्रम राबवत असल्याचं महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितलं आहे. भविष्यात देखील या घटकांचा विचार करून नोकरीची संधी दिली जाईल अस आयुक्तांनी म्हटलं आहे. सुरक्षा रक्षाकाची नोकरी मिळाल्याने तृतीयपंथ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.तृतीयपंथी व्यक्तींमध्ये देखील अनेक उच्च शिक्षित आहेत. ते नोकरी करतात, अस तृतीयपंथी निकिता यांनी सांगितलं आहे. १७ वर्षांपूर्वी साडी नेसली होते. कधी वाटलं नव्हतं की अशी नोकरी मिळेल. पण महानगर पालिकेने संधी दिली आहे. त्या संधीच सोन नक्की करू. अस तृतीयपंथी रुपाली यांनी म्हटलं आहे. आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, समाज विकास विभागामार्फत तृतीयपंथी या समाजातील घटकासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. रोजगाराबाबत या घटकांना संघर्ष करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून घेतलं आहे. ग्रीन मार्शल पथक आहे त्यात देखील त्यांचा सहभाग आहे. यांची अवहेलना पाहिली तर त्यांना समाजात स्थान देणं महत्वाचं आहे. अस पाटील म्हणाले आहेत.