चिमुकलीच्या अकाली निधनाने वनपुरीत शोककळा ; वनभोजन साधेपणाने.

Bharari News
0

सासवड बापू मुळीक 
      वनपुरी ( ता. पुरंदर ) येथील सामाजिक कार्यकर्ते विकास कुंभारकर यांची तीन वर्षे वयाची गोपी कुंभारकर या मुलीचे अकाली निधन झाल्याने गावात एकच शोककळा पसरली आहे.  
शुक्रवार १७ रोजी तिला ताप आल्याने रात्री सासवड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तेथून हडपसर येथे एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु मेंदूत ताप शिरल्याने तिला झटके बसले आणि त्यातच सोमवारी तीचे निधन झाले. कित्येक वर्षानंतर घरात मुलगी झाल्याने संपूर्ण कुटुंबीय आनंदी होते. परंतु अचानक झालेल्या निधनाने तीचे आई वडील आणि संपूर्ण गावात दुःखाचे सावट पसरले आहे.   
दरम्यान आषाढ महिन्यातील पौर्णिमेनंतर पहिल्या मंगळवारी गावचे वनभोजन असते. मंदिरातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची पालखी वनात नेवून छाबिण्याचा कार्यक्रम पार पडतो. अंगात देवाचा संचार होवून पाऊस पाण्याचे भाकीत वर्तविण्यात येते. देवाला पुरण पोळीचा नैवद्य देवून पाहुण्यांना पोळ्या जेवणास दिल्या जातात. त्यानुसार मंडळावर १९ रोजी वनभोजन होते. परंतु गावात घडलेल्या अनपेक्षित घटनेने सर्वत्र शोककळा पसरली. अनेकांनी देवास नैवद्य अथवा सणच साजरा केला नाही. त्यामुळे परंपरेनुसार देवास अभिषेक घालून आणि पालखी मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत पालखी वनात नेवून अत्यंत साधेपणाने वनभोजन साजरे करण्यात आले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!