सुनील भंडारे पाटील
देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक बदल होत असून राष्ट्रपती पदासाठी गेल्या 75 वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा आदिवासी व्यक्ती राष्ट्रपती पदावर विराजमान होते ही खूप अभिमानाची बाब आहे,
यूपीए चे उमेदवार यशवंत सिन्हा यांना राजकीय पटलावर मागे सारत एक महिला द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती निवडणुकीत बाजी मारत पंधराव्या राष्ट्रपती बनले आहेत त्यांचा शपथविधी 24 जुलैला होणार आहे,
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रपती मुर्मू यांना 540 एवढे मताधिक्य मिळाले होते, देशातील विरोधी पक्षांनी देखील आदिवासी महिला म्हणून मुर्मू यांना पाठिंबा दिला होता, यामध्ये काँग्रेसच्या मतदारांनी देखील क्रॉस वोटिंग केले, दरम्यान भारतीय जनता पार्टी पक्षाने मुर्मू यांना उमेदवारी देऊन विरोधकांना हातबल केल्यासारखे झाले आहे, महाराष्ट्र राज्यात राजकीय क्षेत्रामध्ये चाणक्य समजले जाणारे राष्ट्रवादी पक्षाचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांना राष्ट्रपतीपदासाठी नक्की करण्याचे ठरले असताना, पवार साहेबांनी स्वतः नकार दिला, त्यानंतर भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने मुर्मू यांचे नाव फायनल करण्यात आले, आणि अखेर द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची लढाई जिंकली, आणि अखेर स्वातंत्र्याच्या पंधराव्या पंचवार्षिक राष्ट्रपती पदावरती द्रौपदी मुर्मू यांनी दणदणीत विजय मिळवला,