सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
पंढरपुरला कोणी देवासाठी जातो, तर कुणी पोटासाठी ! आषाढी वारी साठी वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पायपीठ करत येतात . काही हवशे गवशेही असतात . घरी म्हातारं लय त्रास देतं वा पैसे काही व्यसनात खुप पैशाची बरबादी करतात, म्हणुन पोरं दिंडीत धाडतात .
इकडे पोटासाठी दोरीवरचा जिवावरचा खेळ करणाऱ्या चिमुरड्या डझनभर ठिकाणी दिसल्या, त्या दोरीवर चालत असता त्यांची आई लहानग्याला कडेवर घेऊन दोन - पाच रुपये गोळा करून गुजराण करते . तर दुसरीकडे केवीलवाणी शाळा बाह्य मुले आसुसल्या नजरेने उभीयत .
देशातील विषमतेने कळस गाठलाय . फक्त ५ % अमिरजाद्याकडे ७०% संपती एकवटली असून २०% जनता दारीद्रय रेषेखाली आहे. समान नागरी केला तरच हे भिषण चित्र बदलू शकते . विठ्ठल नामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांना दानशूर लोक अन्नदान करून पुण्य प्राप्ती करतात . पण या अशा जिवनाच्या प्रवासात लाचारपणे सामना करत जगणाऱ्यांच काय? नेत्यांना सतेच्या खेचाखेचीत यांचं काही सोयर सुतक नाही त्यात गुंतल्याने त्यांना वेळ नाही . आता विठुरायाच त्यांचा वाली म्हणुन या दीन दुबळ्यांनी पंढरपुरचा आसरा घेतल्याचे डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या मुलीच्या आईने केवीलवाना चेहरा करत सांगीतले .