शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
शिक्रापूर परिसरात सलग तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
शिक्रापूरसह परिसरात दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र सुमारे १५ दिवसाच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुणे-नगर मार्गावर तर लोणीकंद, फुलगाव फाटा येथे रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे आज शुक्रवार (दि.२९ जुलै) रोजी लोणीकंद ते कोरेगाव दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. तसेच सखल भागात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना दुचाकी चालविताना कसरत करावी लागत होती.