शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सुवर्ण कन्या व पुणे येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अवंतिका नरळे हीची अमेरिकेत आंतरराष्ट्रीय अथेलेटीक्सची जोरदार तयारी सुरू आहे. सराव शिबिरातील अनुभव तिने फेसुकवरही आपल्या चाहत्यांसाठी प्रसिद्ध शेअर केले आहेत.
अवंतिका नरळे या खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय अथेलेटीक्स स्पर्धेसाठी भारतीय संघाला व आपल्या सुवर्ण कन्येला राज्याचे विरोधीपक्ष नेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य ऍड. संदिपजी कदम, खजिनदार ऍड. मोहनरावजी देशमुख, उपसचिव लक्ष्मण पवार, सह सचिव ( प्रशासन) आत्माराम जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.