समसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
संत निळोबाराय पालखी सोहळ्यातील दिंड्यांच्या राहुट्या व तंबू पावसामुळे करकंबचे प्रसीद्ध सिद्धनाथ मंदिराचे परीसरात लावल्या पहाटेचे काकडा भजनाचे नंतर सकाळी अल्पोपहारापुर्वी दिड तास आपापल्या तंबु मध्ये भजनाचा गजर करत परीसर हरीनामाचे अभंग गायनाने दणाणून गेला .
पालखीचे बैल जोडीचे मानकरी असलेल्या चिंचोली मोराचीचे म्हाळसाकांत दिंडीत भजन चालू असता बाजूचे निघोज, विठ्ठलवाडी, आमदाबाद, गुणवरे आदी साऱ्या तिसेक दिंड्याचे राहुट्यांमध्ये भजन गायनाचे स्वर निनादत होते . हा सुख सोहळा स्वर्गी नाही या संत वचनाचा अनुभव इथे अभंगाचे ध्वनी कानावर पडता येत होता . 'आनंदाचे डोही आनंद तरंग 'या अभंग वाणीचा प्रत्यय पंढरीच्या वाटेवर क्षणोक्षणी येत आहे. .