चक्क डॉ. महिलेला फसवले सायबर चोरट्यांची वाढती दहशद क्रेडिट कार्ड कर आकारणी म्हणून स्वतः पैसे क्रेडिट केले

Bharari News
0

 

लोणी काळभोर अनिकेत मुळीक

           सायबर चोरट्यांनी डॅाक्टर महिलेकडे बतावणी करून तिच्या बँक खात्यातून एक लाख ९७ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका डॅाक्टर महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डॅाक्टर महिला हडपसर भागात राहायला असून एका रुग्णालयात त्या नेत्र चिकित्सक आहेत. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला होता.                                  

क्रेडिट कार्डवर काही अतिरिक्त करांची आकारणी करण्यात आली असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. त्या वेळी डॅाक्टर महिलेने क्रेडिट कार्ड वापरण्यास नकार दिला. तेव्हा चोरट्यांनी क्रेडिट कार्ड सुविधा देणाऱ्या वित्तीय संस्थेच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी संपर्क साधून माहिती घेतील, अशी बतावणी चोरट्यांनी केली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी डॅाक्टर महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून एक लाख ९७ हजार ८२७ रुपये लांबविले. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक शिवले तपास करत आहेत.


 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!