शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सुवर्णकन्या व पौड रोड कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अवंतिका संतोष नरळे हिची अमेरिका येथे होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप मैदानी स्पर्धेसाठी १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात भारतीय संघात निवड झाली आहे.
मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंतिका नरळे हिचा सन्मान करताना महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे.(छाया : नमीरा डिजीटल)
मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंतिका नरळे हिचा सन्मान करताना महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे.(छाया : नमीरा डिजीटल)
अवंतिका नरळे या खेळाडूचे या निवडीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव संदीपजी कदम तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांनी नरळे या खेळाडूचा या निवडीबद्दल सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.योगेश पवार, प्रा.अनिल दाहोतरे तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.