सासवड बापू मुळीक
पुरंदर तालुक्यातील ब्रह्म सांप्रदाय संस्था, श्रीक्षेत्र भिवडी येथील श्री सद्गुरू साधू बाबा महाराज सावळाराम क्षीरसागर यांच्या समाधी मंदिरावर गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. साधू सेवा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री सद्गुरु साधू बाबा महाराज यांच्या मठावर पहाटे ४ ते ५ या वेळेत श्री सद्गुरु रामभाऊ मास्तर महाराज समाधी पूजन, पहाटे ५ ते ७ सद्गुरू साधू बाबा महाराज समाधी पादुकांची आग्र पूजा व आरती सकाळी ७ ते ८ नामस्मरण सोहळा, सकाळी ८ ते ९ होम, हवन, तर सकाळी ९ बालभोग, सकाळी १० ते १२ हरी कीर्तन शिवशंभू व्याख्याते ह भ प गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे किर्तन संपन्न झाले. दुपारी १२ वा. वैकुंठवासी नारायण नवले महिला विश्रामगृह या नूतन वास्तूचे उद्घाटन दिलीप नवले यांच्या हस्ते संपन्न झाले. तर १२:३० ते ४ या वेळेत महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर यावेळी साधू सेवा पुरस्काराने शालनताई भिंताडे, दिलीप नवले, माजी जि. प. सदस्या व महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, नवनाथ पारगे, किरण रानवडे, हिरामण रानवडे, शिवाजी बुचडे, युवा कीर्तनकार सदानंद महाराज बग, राजेंद्र देशमुख, उमेश क्षीरसागर, सतीश मांढरे, छाया गवळी, किशोर क्षीरसागर, अक्षय क्षीरसागर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, रामदास मेमाणे,घनश्याम थोरवे, संतोष बुचडे, आशिष गावडे, योगेश पोटे, सुरेंद्र सुबंध, राहुल बोराटे, अंजली येप्रे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री सद्गुरू साधू बाबा महाराज यांचे पन्नासावी पुण्यतिथी सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तर महिलांसाठी या मठावर मोठी गैरसोय होत असल्याने शालन भिंताडे व राहुल नवले यांनी मोठी मदत केल्याने महिला विश्रामगृह उभे राहू शकले असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र येप्रे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन ब्राह्म सांप्रदाय संस्थान श्रीक्षेत्र भिवडीचे अध्यक्ष राजेंद्र येप्रे यांनी केले होते.