शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथील चीमनापिर मळा रस्त्याची दुरवस्था झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
चिमणा पिर मळा व शेणाचा मळा (पोखर जाई नगर ) येथे शाळे पुढे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजबळ यांनी सांगितले की ग्रामपंचायत प्रशासनाला मुरूम टाकण्याची वारंवार विनंती केली आहे.तथापि याकडे लक्ष दिले जात नाही. लवकरात लवकर मुरूम टाकला नाही, तर खड्डा तिथे झाड लावण्याचा उपक्रम हाती घ्यावा लागेल असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.