शिरूर विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीकडून शिरुर पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरे केले आहे
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना भारत सरकारच्या गृहविभागाकडून 'केंद्रीय गृहमंत्री पदक'जाहीर झाल्याबद्दल आखिल भारतीय मराठा महासंघातर्फे वृक्षाचे रोपटे देवून अभिनंदन करण्यात आले .सुरेश कुमार राऊत व त्यांचे शिरूर पोलीस स्टेशन मधील त्यांचे सहकारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शोभना पाचंगे ,जिल्हाध्यक्ष शैलजा दुर्गे,शहर अध्यक्ष उर्मिला फलके ,तालुका उपाध्यक्षा ज्योती हांडे , ज्योती वाळके ,दसगुडे ,वैशाली बढे इ.महिला पदाधिकार्यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन साजरे केले.