शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
शिक्रापूर - चाकण रस्त्यावर जातेगाव खुर्द येथे ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
शिक्रापुर पोलीस ठाण्यात याबाबत सुरज सुरेशराव अडसड (वय ३७ वर्षे, रा.करंदी ता शिरुर जि पुणे) यांनी फिर्याद दिल्याने शिदोबा साहेबराव दगडे (वय ४८ वर्षे, सध्या रा. सेक्टर नं १,प्लाँट नं ७२/५ ,फ्लँट नं २०३, दुसरा मजला, प्रकाश निलय सोसायटी, इंन्द्रायणी नगर ,भोसरी ता हवेली जि पुणे, मुळ रा दौंडज ता पुरंदर जि पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार (दि. १८ ऑगस्ट) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मौजे जातेगाव खुर्द (ता शिरुर, जि पुणे) गावचे हद्दीत शिक्रापुर चाकण शिक्रापुर रोडवर ,पंजाबी खालसा हाँटेल समोर शिदोबा साहेबराव दगडे याने त्याचे ताब्यातील अशोक लेलंन्ड कंपनीचा ट्रक (क्र. एमएच १४ डीएम ०७९६) वाहतुकीच्या नियंमाकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन महादेव परमेश्वर भगत (वय ३७, सध्या रा.जातेगाव खुर्द, ता.शिरूर, जि. पुणे, मूळ रा.अमडापुर, ता.चिखली, जि. बुलढाणा) याच्या अँक्टीव्हा मोटारसायकल (क्र. एमएच १२ एनएन ८८१८) ला समोरुन धडक दिली. या अपघातात महादेव परमेश्वर भगत हा जागीच ठार झाला. शिक्रापूरचे पोलिस निरिक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखालीपोलिस हवालदार माने पुढील तपास करत आहेत.