गुनाट येथे शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

Bharari News
0
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
         गुनाट (ता.शिरूर) :- येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे साहेब यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.      
गुनाट ग्रामपंचायतच्या तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपला माणूस या नात्याने शिरूर - हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कोळपे सर, विद्यमान सरपंच संदेश कर्पे, उपसरपंच पांडुरंग गव्हाणे, माजी सरपंच गणेश कर्पे,माजी सरपंच रंगनाथ भोरडे, माजी सरपंच गहिनीनाथ डोंगरे, माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी चे संघटन सरचिटणीस माऊली भैरट, माजी उपसरपंच भाऊसाहेब कर्पे, तुकाराम गव्हाणे, रमेश गाडे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चे माजी चेअरमन नानासाहेब भगत,संभाजी अप्पा गाडे, भुजंगराव कर्पे, विद्यमान उपाध्यक्ष राजाराम महाराज वळू,माऊली भगत, शांताराम अखुटे, सचिन कर्पे, शामकांत गोरडे, सोमनाथ गिरमकर, पोलिस पाटील हनुमंत सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य रामदास काकडे, शिरूर तालुका भाजपा उपाध्यक्ष युवा मोर्चा गोरक्ष धुमाळ, विठ्ठल भोस, भाऊसाहेब गवारे, शांताराम भैरट, सचिन फडके, माऊली कर्पे, संतोष कर्पे, अनिल घावटे, रामदास भोरडे,यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी माजी आमदार लोकनेते बाबुराव पाचर्णे यांचा जीवनपट नमुद करत त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून देत बाबुराव पाचर्णे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान सर्व उपस्थितांच्य वतीने शिरूर - हवेलीचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सन १९९५ ते आज पर्यंत गुनाट मध्ये अनेक विकास कामे त्यांनी केली सर्व सामान्य माणसांना ते आपला माणूस म्हणून ओळखत होते ,
गुनाट मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे त्यांनी केली सभामंडप,दत्त मंदिर परिसरात ब्लॉक बसवणे,दत्त मंदिर जिर्णोद्धार, गुणवंतवाडी गणपती मंदिर बांधकाम, मुस्लिम दफन भूमी ,मातंगवस्ती समाज मंदिर, हरिजन वस्ती समाज मंदिर, सिमेंट काँक्रिटीकरण, गुणवंतवाडी अंतर्गत गव्हाणे वस्ती रस्ता इत्यादी साधारणता शिरूर हवेलीचे माजी आमदार लोकनेते आणि आपला माणूस बाबुरावजी पाचर्णे साहेब यांनी आपल्या कार्यकाळामध्ये साधारणतः २ कोटी रुपयाचा निधी देऊन विकास कामे करून गुनाट गावातील वैभवात भर टाकली. हा संघर्ष योद्धा ! देव माणूस! लोकनेता हरपला!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!